Friday, December 23, 2011

अगदी सोपा गार्लिक ब्रेड -



साहित्य -
ब्रेड स्लाईस - १ छोटा पुडा
लसूण पाकळ्या - १०-१२
मीठ - अर्धा छोटा चमचा
पिझ्झा मसाला - २-३ चमचे
मिरेपूड - १ चमचा
बटर किंवा मार्गारीन - गरजेनुसार
कृती -
लसूण आणि मीठ एकत्र करून एकजीव ठेचून घ्यावे. ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून गरम तव्यावर थोडे भाजावे. दुसऱ्या बाजूला थोडी लसणाची पेस्ट लावून थोडी मिरेपूड आणि थोडा पिझ्झा मसाला भुरभुरावा. बटरची बाजू थोडी भाजून झाल्यावर लसूण - मसाल्याची बाजू थोडी भाजावी. गार्लिक ब्रेड तयार. सोपा, स्वस्त आणि चवदार !

[ शक्यतो ब्राऊन ब्रेड वापरावा. मैद्याच्या मऊ पांढरया ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड चवीला आणि पचायला अधिक चांगला आहे.पिझ्झा मसाला बाजारात तयार विकत मिळतो. पिझ्झा मसाला बॉटल २५ रुपयात १०० ग्रॅम येतो. ३ वर्षे टिकतो. डॉमिनोजच्या ६५-७० रुपयांच्या ६-७ छोट्या ब्रेड स्टिक्स पेक्षा घरी बनविलेला हा गार्लिक ब्रेड केव्हाही अधिक चांगला! ]

0 comments:

Post a Comment