Monday, December 19, 2011

जग साल्या जग...

जग साल्या जग,
अंगात रग असेल तोवर जग...
पाठीवरती घेऊन आभाळ, पुन्हा आभाळालाच बघ...
जग साल्या जग !

धावत जाऊन सुर्यापाशी मुठभर त्याचे तेज आण,
आणि मग जीवनाच्या ज्योतीला सांग,हवे तसे तग...
इतका प्रचंड वेग आण नि वादळाहून तेज हो,
तुला आडवणाऱ्या पर्वतांची राख, क्षणात होईल मग....
जग साल्या ,जग !

कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना,
कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग...
इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल,
उरलेल्या निखार्यांचीही हि आगीलाच लागेल धग...
जग साल्या जग !

काबीज कर एक एक तर नि अंतरीक्ष सारा,
डोईवर तू असशील त्यांच्या नि तुझ्या पायाखाली ढग...
जग इतक अर्थपूर्ण कि वेदांच्या ओवीतून तू उमग,
विशाल हो इतक कि सागराच्या तहानेलाही लागेल तुझी तगमग...
जग साल्या जग!

जग असा होऊन निडर कि आदर्श होशील जगण्याचा,
नंतर देवही येऊन सांगेल हाच माझा खरा जिवलग...
जग साल्या जग...
अंगात रग असेल तोवर जग....

( सौजन्य - किरण माने )

2 comments:

  1. अप्रतिम...

    ReplyDelete
  2. जग साल्या जग,