Tuesday, January 31, 2012

Why to post everywhere that you love your GOD? Is it really necessary?

A missionary in Germany once said, “Why did Hindus never set out of Indian soil to propagate their religion? It’s just because they knew, it’s not worth.”

And immediately Maxmuller replied, “For Hindus, religion is like Mother. She is the most beautiful of all. Bhagwadgita says, that if you try to prove your worth by propagating the beauty of your mother, then the outside world will see her as a prostitute. Hence, propagate the value of your mother by your deeds, that we call our ‘Karma’. The value of a mother is known by the deeds done by her child. If your ‘Karma’ is good, then automatically your mother will be the most respected.”

The Churches in Germany banned Maxmuller for saying this & the result was that the entire world started rushing madly to India, to know more about this religion; & Hinduism became the most respected religion of the world, though we never propagate it & will never do.

If you really believe in something & really respect it, then there is no need to shout out all the time saying that you love your God. Your love & faith is clearly visible in your deeds.

Friday, January 27, 2012

आयुष्य...

आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसलं तरी,

एकट्यानेच ते फुलवत रहा..........


वादळात सगळं वाहून गेल

म्हणुन रडत बसू नका,

वेगळ अस काही,

माझ्यात खास नाही

असं म्हणून उदास होऊ नका......


मृगाकडे कस्तुरी आहे,

फुलात गंध आहे,

सागराकडे अथांगता आहे,

माझ्याकडे काय आहे ?

असं म्हणून रडू नका...........


अंधाराला जाळणरा

एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.

आव्हान करा त्या सूर्याला,

मग उगवेल तो तुमच्या

आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.........

Tuesday, January 24, 2012

Hotel California Gujju Version

On Eastern express highway
Navratan tel in my hair
Warm smell of theplas
rising up in the air
Up ahead in the distance
I saw a shimmering light
My had grew havy, aney, my sight grew dim
It was Hetal ben I was right!

There she stood on the highway
I heard the ringtone bale
And I was thinking to myself
This could be Phalguni Pathak, not Adele
Then she lit up a metch stick
and she showed me the way
There were voices down the corridor
I thote I heard them say...

Welcome to the nite of disco dandiya
Such a lovely place, Such a lovely face
Planty of food at disco dandiya
Nine nights of year, you can find it here

Her mind is gathiya-twisted,
she got the healthy thighs
She got a lot of pratty pratty boys, that she calls bhais!
How they do garba in cot yard,
switt summer swat
Some go arararara,
and some forgat!

So I called Baku fui's husband
please bring my chaas
he said we havent had that glass since we have nirjal upwaas
End steel those voices are colin froam far hawey!
Wake you up in the middle of ratrau
Just to hear them say...

Welcome to night of disco dandiya
Such a lovely base Underneath your drase ;)
They shakin it up at disco dandiya
what a nice surprise, bring Rames, Sures bhais!

Mirrors on the ghagra choli
Pink odhni that is supakk nice
Aney she jau we are al just dancer here,
wearing zari work on our Levi's
And then at Ghatkopar samaaj hole, They gaythered for the feast
They eat it all with gusto and go back to buffet hole for one more repeat!

Last thing I remember,
I was Running for the loo
I had to wait back for people
to finish before
Relax said Bakul maasa
We are programmed to receive
You can EAT as much as you want
But you cannot just SHEET=D

Tuesday, January 17, 2012

दोन तत्त्वं -

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'

शेतकऱ्याला वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता.

शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते,
ते त्याच्या गावीही नव्हते.

नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!

कुठलंही काम, प्रॉजेक्‍ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.

तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या.तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.

कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे.

तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.

दोन तत्त्वं जपा :
"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात "

Monday, December 26, 2011

झाड


• बरं झालं
या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो . . .
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन म्हणतो. . .
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन . . .
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

लव्हलेटर...

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं

सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं

गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं

घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं


लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं

कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं

सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं

आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं

पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!


लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं

वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं

शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं

नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युटबर्ड असतं

होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!


लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं

५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं

ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं

सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं

हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!


लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं

लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं

अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं

तिसरयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं.

Saturday, December 24, 2011

कुणीतरी आठवणं काढतय...

हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल,
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल,
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास,
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो ठसका ??
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे,
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे,
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही,,
"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...